सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : वार्ताहर
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी हद्दीतील राजबाग येथील तोडणी योग्य झालेल्या सात एकर ऊसाला शॉक सर्कीटने आग लागुन मोठे नुकसान झाले. त्यामुळे या ऊसाला सोमेश्वर कारखान्याने त्वरीत तोड द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागिल दोन दिवसापासुन जोराचे वारे वाहू लागले आहे. या वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे घर्षण होवुनही आग लागली. त्यानंतर काही क्षणातच ऊसाने पेट घेतला. त्यामुळे या आगीत काळखैरेवाडीचे माजी सरपंच विलास खैरे, विजय खैरे, हरीभाऊ गायकवाड, महेश गायकवाड आणि गणेश चांदगुडे यांच्या सुमारे सात एकर ऊसाचे नुकसान झाले.
यासंदर्भात वीज वितरण सुपे येथील शाखा अभियंता अभिषेक मडावी यांनी घटनास्थळी जावुन पहाणी केली. याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे मडावी यांनी सांगितले. ............................................