भुताटकी कशी होते? कसे करतात बुवा-बाबा चमत्कार? अशा गोष्टी जाणून घ्यायच्यात तर... 'अंनिस'च्या शिबिराला उद्या बारामतीत या.....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या तालुका शाखेच्या वतीने रविवारी (ता. २० मार्च) एक दिवसीय मोफत 'कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण भापकर यांनी दिली. 
बारामतीतील युवा चेतना सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांसाठी पाटस रोडच्या महात्मा फुले मंगल कार्यालयात सकाळी नऊ ते पाच या वेळेत सदर शिबिर होणार आहे. शिबिरात 'अनिसची चतुःसुत्री' या विषयावर तर प्रशांत पोतदार हे 'जादूटोणा विरोधी कायदा' या विषयावर बोलणार आहेत. मिलिंद देशमुख हे 'चमत्कारांमागील विज्ञान' सांगणार आहेत तर नंदिनी जाधव या 'महिला व शोषणाच्या बेड्या' हा विषय स्वतःच्या कार्याच्या आधारे मांडणार आहेत. 'देवधर्माविषयक अंनिसची भूमिका' याबाबत श्रीपाल ललवाणी विेचन करणार आङेत तर अदिल बेलदार हे भूताने झपाटणे व देव अंगात येणे या बाबींना उजेडात आणण्यासंदर्भात प्रशिक्षण देणार आहेत. बाळकृष्ण भापकर हे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेणार आहेत. 
 
To Top