सोमेमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर दि १९
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयातील डॉ रेश्मा मोहिद्दीन पठाण यांना 'यंग रिसर्चर ऑफ दि इयर ॲवार्ड' नुकताच प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथील आविष्कार फाउंडेशनच्या वतीने आविष्कार अचिव्हर्स अवार्ड २०२२ अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव जयवंतराव घोरपडे, प्राचार्य डॉ देविदास वायदंडे, उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे, डॉ जया कदम, डॉ प्रवीण ताटे देशमुख, सतीश लकडे यांनी अभिनंदन केले आहे.