सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गालगतच्या कासुर्डी खे.बा. ता.भोर येथील कारपेंट (कलर स्प्रे)बनविणाऱ्या इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शनिवार दि-१९ दुपारी ३ च्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोटच्या-लोट पसरले होते.तर आग आटोक्यात येईपर्यंत घबराहटीचे वातावरण होते.आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून जीवित हानी झालेली नाही.
कंपनी सुरु असतानाच अचानक आग लागून आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले होते.स्थानिक नागरिक व ४ अग्निशमन दलाच्या बंबानी आग विझविण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू होते.काही वेळात आग आटोक्यात आनण्यात अग्निशमन दलाला यश आले .
फोटो पाठवीत आहे.