सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय (जावली तालुका अ वर्ग) मेढा यां संस्थेच्या वतीने ग्रंथपाल दिन व महिला दिनाचे औचित्य साधून " पुरस्कार वितरण, सत्कार समारंभ, व महिलांसाठी हळदीकुंकू " अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन वाचनालयाचे विजयाताई थत्ते सभागृहात रविवार दि. २० मार्च रोजी दुपारी १ वा. करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे व सचिव धनंजय पवार यांनी दिली .
या कार्यक्रमात जेष्ठ विचारवंत , व्याख्याते श्रीधर साळुंखे ( सर) यांचे व्याख्यान आयोजीत केले असून या कार्यक्रमात ग्रंथालयीन ,व सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे . संस्थेचा मानाचा " जीवन गौरव पुरस्कार " चंद्रकांत उर्फ बबनराव वारागडे यांना जाहिर करण्यात आला आहे. तर सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असल्या बध्दल हणमंतराव पवार (आलेवाडी), विजय सावले ( भामघर),यांना विशेष पुरस्कार तर स्व. सौ. मंदाकिनी ओंबळे आदर्श शिक्षिका यांचे स्मरणार्थ जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ती पुरस्कार सौ. सुनिता कदम ( सातारा), कै. शामराव बापुराव क्षीरसागर ( आदर्श शिक्षक ) यांचे स्मरणार्थ " आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार " जीवन इंगळे(बुध) यांना डॉ एस्. आर. रंगनाथन जिल्हास्तरीय " आदर्श ग्रंथपाल " पुरस्कार संजय इंगवले ( पाटण), स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे ( आदर्श शिक्षिका)यांचे स्मरणार्थ जिल्हास्तरीय आदर्श पालक पुरस्कार , संभाजीराव पाटणे जेष्ठ विचारवंत यांना, स्व. जनाबाई पार्टे यांचे स्मरणार्थ आदर्श माता पुरस्कार _ सौ. इंदुमती काशिलकर, तसेच स्व. सावित्री सिताराम थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्कार , सौ. वीणा देशपांडे, सौ. शिल्पा फरांदे , सौ. योगिता मापारी यांनी जाहीर झाला आहे. ग्रंथापाल महादेव जंगम यांचा सेवानिवृत्ती निर्मित्त सपत्नीक सत्कार मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील ग्रंथालयीन चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास उपस्थीत राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.