सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Baramati big breaking ! सांगवी येथे गॅस एजन्सी मालकाच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सांगवी : प्रतिनिधी
सांगवी (ता. बारामती ) येथील भारत  गॅस एजन्सी मालकाच्याच घरी शनिवारी सकाळी १० च्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत वाशिंग मशीन,कपाट व गादीसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. वाशिंग मशीनचे शॉर्टसर्किट झाल्याने गॅस सिलिंडरचा स्पोट झाल्याचे गॅस एजन्सी  मालक अरुण गव्हाणे यांनी सांगितले. 

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या पाठीमागील बाजूस मोठी लागल्याने घरातील महिलांनी आग विझविण्यासाठी परिसरातील तरुणांना मदतीसाठी बोलावले. स्पोट दरम्यान मोठ्याने आवाज येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी भीती व्यक्त केली. यावेळी परिसरातील ४ ते ५ तरुणांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. बादली व मिळेल त्या साहित्याने आग विझविण्यात यश मिळवले. तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेने आग आटोक्यात आली. यावेळी अग्निशमन दलाला देखील पाचारण करून राहिलेली आग नियंत्रणात आणण्यात आली. यावेळी तीन ते चार टाक्याना आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्श नागरिकांनी दिली. यावेळी एका कामगाराच्या हाताला भाजले आहे.

तर यामध्ये लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. स्पोट दरम्यान शेजारील तरुणांनी इतर गॅस सिलिंडर टाक्या विझवून बाहेर फेकून दिल्या.  यामुळे मोठा अनर्थ टळला. गॅसची एजन्सी चालविणाऱ्याच्याच घरातच सिलिंडरचा स्पोट झाल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यावेळी माळेगाव पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.

गोडाउनमधील २० ते २५ मोकळ्या कमर्शियल सिलेंडरच्या टाक्या घरी आढळून आल्या. तसेच घराच्या पुढील आवारात सिलेंडरने भरलेला एक पीकअप पुढे उभा करण्यात आला होता.आग लागताच हा पीकअप देखील तेथून हलविण्यात आला. यावेळी आग विझवताना गेस एजन्सी मधील कामगार भाजला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यामुळे परिसरातील लोकांनी पुन्हा असे विघातक प्रकार घडू नये यासाठी गॅस एजन्सी मालकाच्या घरी  सिलेंडरच्या भरलेल्या व  मोकळ्या टाक्या न ठेवण्याची मागणी गेली आहे. यामुळे सिलेंडरच्या टाकीचा स्पोट नेमका कशामुळे झाला यावर परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडला तपासात लवकरच उघड होईल.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Baramati big breaking ! सांगवी येथे गॅस एजन्सी मालकाच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट
Baramati big breaking ! सांगवी येथे गॅस एजन्सी मालकाच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट
https://lh3.googleusercontent.com/-9qMgEV-8zCU/YjW83A2esiI/AAAAAAAANrM/YhbH7rikYe8oGyPRCRlub1PdcbytTVndwCNcBGAsYHQ/s1600/1647688900414533-0.png
https://lh3.googleusercontent.com/-9qMgEV-8zCU/YjW83A2esiI/AAAAAAAANrM/YhbH7rikYe8oGyPRCRlub1PdcbytTVndwCNcBGAsYHQ/s72-c/1647688900414533-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/03/baramti-big-breaking.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/03/baramti-big-breaking.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy