सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
समाजीकतेचे भान राखीत विसगाव खोऱ्यातील बाजारवाडी ता.भोर येथील वारकरी सेवेत अखंडितपणे वाहून घेणारे तानाजी नारायण शिंदे ( आबा )यांच्याकडून आपटी ता.भोर येथील आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
शिंदे बोलताना म्हणाले लहानपणापासून समाज हिताच्या कार्याची आवड व दान करण्याची भावना असल्याने सत्कार्य करीत आलो आहे.यावेळी १० विद्यार्थ्याच्या वस्तूंचे वाटप राहुल महाराज पारठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.