सातारा जिल्हा तालीम संघाला विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार नाही : शरद पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  
जावली प्रतिनिधी:-
सातारा जिल्हा तालीम संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी पुढील महिन्यात सातारा मधे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अनुषंगाने बारामती येथे गोविंदबाग याठिकाणी शरद पवार यांचे निवासस्थानी जिल्हा तालीम संघाचे शिष्टमंडळाने भेट घेतली असता मा.शरद पवार यांनी सातारा तालीम संघाच्या पदाधिकारी याना पूर्णपणे आश्वासन देत सातारा मधे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या सातारा जिल्हा तालीम संघाच्या आयोजना च्या खाली संपन्न होतील असे सांगितले. 
         महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना जिल्हा तालीम संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ स्थानिक कामकाजाच्या व संयोजना च्या धुरा  जिल्हा तालीम संघ कडे सोपवण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या प्रथेप्रमाणे ज्या जिल्ह्यांमध्ये कुस्ती चे अधिवेशन असेल त्या ठिकाणी तिथला जिल्हा तालीम संघ हा आयोजक असतो आणि तिथले सदस्य राज्य कुस्तीगीर परिषदेचे सभासद असतात त्यातूनच आपली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तयार झालेली आहे .असे असताना शासकीय अधिकारी यांची दिशाभूल करून अथवा कोण अपरिचित व्यक्ती हाताला धरून जर का जिल्ह्यामध्ये स्थानिक पैलवान आणि संघटनेला डावलून ढवळाढवळ करत असेल तर त्या गोष्टीची नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली जिल्ह्यामध्ये तात्काळ कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांची बैठक बोलावून संयोजनाचे पूर्ण अधिकार जिल्हा तालीम संघाकडे तात्काळ देण्याविषयी आदेश केले आहेत दिनांक चार ते नऊ एप्रिल रोजी आपल्या शहरांमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सर्व  कुस्तीगीर उत्साहाने सहकार्य करण्यासाठी व हिरीरीने भाग घेण्यासाठी तयार आहेत पवार साहेबांनी जिल्हाधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना दूरध्वनीवरून निर्देश दिले सदर स्पर्धेसाठी सर्व पातळीवर जिल्हा तालीम संघ यांना विश्वासात घेतल्याशिवाय काम करता येणार नाही. 
       या भेटीप्रसंगी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार (भाऊ )पैलवान संपतराव साबळे महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे चंद्रकांत सूळ आबा सुळ माणिक पवार संदीप साळुंखे विकास गुंडगे जीवन कापले यशवंत चव्हाण प्राध्यापक रुस्तुम तांबोळी दीपक पवार बलभीम शिंगरे वैभव फडतरे जितेंद्र कणसे व सुधीर पवार उपस्थित होते
To Top