वाई ! वनविभाग कार्यालयातील वनरक्षक सुरेश पटकारे अखेर निलंबित : सोमेश्वर रिपोर्टरच्या पाठपुराव्याला यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ 
सातारा जिल्ह्याचे फॉरेस्टचे ऊपवन सौरक्षक आणी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून नाव लौकिक प्राप्त असलेले महादेव मोहिते यांनी सोमेश्वर रिपोर्टर मध्ये अनेकदा आलेल्या वृत्ताची गंभीर  दखल घेऊन आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन गोपनीय पध्दतीने चौकशीचे काम सुरु केले होते.
      त्या वेळी वाईच्या फॉरेस्ट कार्यालयात गेल्या अनेक वर्षां पासून ठाण मांडून बसलेले वनरक्षक  वैभव शिंदे आणी सुरेश पटकारे या दोघांनी गटबाजी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत साजुक पणाचा आव आनत आपल्या विरोधात जो आवाज ऊठवेल त्याच्या वर  लाचलुचपतचे  खोटे गुन्हे दाखल करुन  जाळ्यात अडकवून कायमचा 
 घरचा रस्ता दाखवु अशी वेळो वेळी दमबाजी करुन    तेथील प्रमुख अधिकारी वर्गासह कार्यालयातील कर्मचार्यांच्या वर  दहशत निर्माण करुन आम्ही सांगणार त्या पध्दतीनेच काम काज झाले पाहिजे अशा दबंगगीरी मुळे फॉरेस्ट खात्याशी प्रामाणिक राहून  काम करणारे  अधिकारी व कर्मचारी भितीच्या छायेखाली दिवस मोजत जगत होते. हे वरिष्ठांच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानेच वनरक्षक सुरेश पटकारे याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो अंतिम मंजुरी साठी पाच जिल्ह्याचे कार्यालय कोल्हापूर येथे असलेले  मुख्य वन संरक्षक  रामानुजम याचे कडे पाठविण्यात आला होता त्यांनीही या प्रस्तावाचा गंभीरपणे 
अभ्यास करुन त्याच्यावर निलंबनाची कारवाई 
करण्याचे आदेश दिले होते. 
       त्या आदेशाची अंमलबजावणी सातारा कार्यालयातील ऊपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी तात्काळ करुन वनरक्षक सुरेश पटकारे याला निलंबित केले तर
या आधीच वैभव शिंदे याला दि. २ मार्च ते ३१मार्च अखेर  सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे महादेव मोहिते यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाई मुळे फॉरेस्ट मध्ये एकच  खळबळ ऊडाली आहे .या धडकेबाज कारवाई मुळे महादेव मोहिते यांचे  वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील नागरिकांन कडुन अभिनंदन होत आहे .
         वनरक्षक सुरेश पटकारे हा वाई तालुक्यातील गावांगावात  स्थापन करण्यात आलेल्या वन समितीचा सचीव म्हणून कामकाज पाहत होता 
या समीती मार्फत गावांचा विकास करण्या साठी वन मंत्रालया  मार्फत निधी येतो त्या आलेल्या निधीतून गावा गावांचा काय विकास केला तो कुठे कुठे खर्च केला याचा अहवाल राज्य शासनाला पाठवावा लागतो याची जबाबदारी वनरक्षक सुरेश पटकारे याच्या वर सचीव या नात्याने होती त्यात त्याने  भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे तर बेकायदेशीर पणे झालेली वृक्षतोड त्या मुळे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची चार्जशीट हि ६० दिवसात कोर्टात पाठविने बंधनकारक असताना देखील  वृक्षतोड मालकांशी आर्थिक तडजोडी करुन  त्यांची चार्जशीट जानीव पुर्वक  कोर्टात वेळेत न पाठविल्या मुळे आरोपीस निर्दोष सुटण्यास पटकारे हा मदत करत असत .वृक्षतोडीची प्रकरणे दोन महिन्यात निकाली काढण्याचे वरिष्ठांचे आदेश नेहमीच धुडकावून आरोपीस  मदत करणे गावो गावच्या वन समिती कडे शासनाने दिलेल्या निधी पैकी किती निधी शिल्लक राहिला याचे रेकॉर्ड वरिष्ठांना न  दाखवने अशी विविध प्रकारची अती गंभीर  प्रकरणे सातारा येथील वरिष्ठ अधिकारी असलेले  उपवन संरक्षक महादेव मोहिते व त्यांच्या टिमने केलेल्या तपासणी दरम्यान हे उघड झाल्यानेच वनरक्षक सुरेश पटकारे याला तडका फडकी निलंबित करण्यात आले आहे .
To Top