'या' कंपनीचा कार इन्शुरन्स घेताय तर सावधान...! क्लेम पासींगला अनंत अडचणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी 
आजकाल ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष विमा कंपन्या गाड्यांचे विमा काढुन शुन्य टक्के खर्चात क्लेम चे आमीष  चा दावा करतात मात्र प्रत्यक्षात क्लेम ची वेळ आल्यावर एकमेकावर टोलवाटोलवी करुन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला जातो . बारामती मधे टाटा ए. आय .जी  या कंपनीने अशीच टाळाटाळ केल्याची घटना समोर आली आहे . व क्लेम केलाच तर फक्त प्रोसेस फी चा खर्च वसुल होण्याईतपत केला जातो अशी परिस्थिती आहे. येथील ग्राहक स्वत: वकिल असुन त्याना या परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.ग्राहक मंचात व दिवाणी न्यायालयात फसवणूकीचा व नुकसान भरपाई चा दावा  करणार असलेचे फसवणुक झालेले ग्राहक  ॲड गणेश आळंदीकर यानी सांगितले.
      याबाबत अधिक वृत्त असे कि ॲड गणेश आळंदीकर यानी बारामतीतील कसबा चौकातील एजंट विनोद सोलनकर यांचेकडून सलग तीन वर्ष  टाटा.ए .आय जी कार विमा  उतरवला . त्यानी शुन्य टक्के खर्चात गाडी  अपघात वीमा दिला जाईल अशी खात्री दिली. दोन वर्ष गाडीला अपघात झालाच नाही, त्यामुळे विमा क्लेम करण्याचा प्रश्न आला नाही .मात्र तिसऱ्या वर्षी त्यांच्या चारचाकी होंडा कंपनीच्या कारला  एक अज्ञात ट्रक घासुन गेला. त्यांचा आरसा फुटुन काच फेकली गेली व गाडीला स्क्रॅच झाले. त्यानी विमा करण्यास वेळ जाईल म्हणुन तात्पुरत्या स्वरुपात खासगी दुकानातुन मोकळी काच बसवली, परंतु ॲसेब्ली तुटलेली तशीच होती . त्यानंतर गाडी विमा व कामासाठी   येथील" शर्व्हरी मोटर्स" यांचेकडे गाडी नेली. व टाटा ए.आय .जी चे कार विम्याचे एजंट  सोलनकर  याना याबाबत कल्पना दिली . गाडी सर्व्हेयर येईपर्यंत दोन दिवस ठेवली गेली. सर्व्हेअर अर्जुन सुतार पुणे याने उजव्या साईड चा कोपरा फक्त पेंटींग करुन मिळेल असे सांगीतले .वास्तवीक एक पुर्ण बाजुचा आरसा व स्क्रॅच करुन मिळायला पाहीजेत अशी मागणी त्यांच्या मुलाने केल्यावर ..आमचे बघा .असे म्हणून अप्रत्यक्षरित्या त्यांचा मुलगा ऋत्विक यांचेकडे  पैशाची मागणी केली . ॲड आळंदीकर बाहेरच्या राज्यात असल्याने आलेवर पाहतो असे सांगीतले, तर शर्व्हरी मोटर्स वाल्यानी आता क्लेम चा फॉर्म भरला आहे परत रद्द ची प्रोसीजर अवघड आहे असे सांगीतले. आणी अवघ्या १५०० रुपयाचा क्लेम पास झाला . त्यात १०००/- प्रोसेस फी ,वर नो क्लेम बोनस नुकसान बुडले.व चार पाच दिवस गाडी शोरुम ला ... वरिष्ठ अधिकारी वर्गाला कळवले तर टोलवाटोलवी ची उत्तरे मिळाली .वास्तविक गाडीचा वीमा उतरवल्यावर अपघाताबाबत  "तांत्रीक बाबी पाहणे गरजेचे नसुन नुकसानभरपाई देणे कंपनीचे कर्तव्य आहे" असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यात दिले आहेत ,मात्र टाटा ए आय जी सारख्या कंपन्या या अशा आडमुठ्या अधिकारी वर्गामुळे ग्राहकांना त्रास देतायत हे निष्पन्न होते .
     टाटा ए आय जी कंपनी व सर्व जबाबदार घटकाविरोधात आपण फसवणुक व नुकसानभरपाई चा दावा करणार असल्याचे ॲड आळंदीकर यानी सांगीतले. व कार मालकानी विश्वासु सेवा देणाऱ्या कंपन्याकडे व एजंट कडे वीमा उतरला पाहीजे  नाहीतर फसवणुक नक्की आहे हे समजुन घेण्याचे आवाहन त्यानी केले .
To Top