बारामती ! माळेगाव येथे दहा एकर ऊस जळून खाक

Pune Reporter
बारामती दि ८
  शिवनगर येथिल उसाला शॉर्टसर्किटने आग लागुन सुमारे दहा एकर उस जळुन खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे दहा  लाखांहुन अधिक नुकसान झाले आहे.महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
  शिवनगर येथिल शिवारात विज तारांमधे शाॅर्टसर्किटने आग लागली.या आगित गट नं.३९२ मधील नितिन व चेतन दिलीपराव तावरे यांचा तुटुन जाणारा एक एकर व दिड एकर खोडवा,उमेश व शैलैश चंद्रकांत भुंजे यांचा पाच एकर उस व ठिबक सिंचन संच,सतिशचंद्र देशमुख यांचा दिड एकर उस व ठिबक सिंचन संच पुर्णतः जळुन खाक झाले आहे.अनेकांंनी आग विझवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले.
  दरम्यान सदर आगिचा पंचनामा तलाठी अमोल मारग यांनी केला असून या आगित दहा लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे.  
     शिवनगर येथिल आगित उस जळुन खाक झाला आहे.
To Top