बारामती दि ८
माळेगांव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.या निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व महिला कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल शिंदे, डॉ.भक्ती सुभेदार, आरोग्य सेविका स्वाती वाघमारे,साधना वाघमोडे,चैत्राली भैरवकर, लॅब टेक्निशियन गिता काळे, मदतनीस मिरा वाघेला यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन विश्वास भोसले, चंद्रकांत वाघमोडे, दादा सोनवणे,निहाल भोसले, स्वप्निल माळवदकर, आरोग्य सहायक अजित आत्तार,राजु सुतार,दासा जाधव यांनी केले.
फोटो ओळी- माळेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला