सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Pune Reporter
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टिम - - - 
सोमेश्वरनगर दि ८
दिनांक ८ मार्च रोजी एस डी सह्याद्री पब्लिक स्कूल  येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी ,प्रतिभाताई पाटील ,कल्पना चावला, सुनीता विल्यम, सिंधुताई सपकाळ ,आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर अशा अनेक यशस्वी कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्याला आपल्या  भाषणांच्या माध्यमातून उजाळा दिला. विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण केले या कार्यक्रमात  साजिद शेख सर ,खताळ मॅडम व दिपाली गायकवाड मॅडम यांनी आपल्या भाषणांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली .कार्यक्रमांचे संयोजन सांस्कृतिक  विभागातील शिक्षिका  वैशाली गायकवाड  व गौरी फरांदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनश्री सावंत व खताळ मॅडम यांनी भूषवले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री अजिंक्य सावंत सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री वाघमारे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. जुई गायकवाड व कु. वेदांती चाबुकस्वार यांनी केले.
To Top