सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
भुंईज पोलिस ठाण्याचे पिएसआय रत्नदीप भंडारे हे सातारा पुणे आणी पुणे सातारा महामार्गावर रात्र गस्त घालत असताना त्यांना खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि वेळे गावच्या हद्दीत चार चाकी वाहनातील डिझेल
चोरी करणारी टोळी आली आहे .
अशी माहिती मिळताच त्यांनी वेळे गावात सदैव तत्पर असलेल्या पोलिस मित्र असलेल्या पथकाला याची माहिती दिल्याने हे तरुणांचे पथक रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर टेहळणी करत असताना हॉटेल आशिर्वाद परिसरात दिवसभर मालट्रक चालवून थकलेल्या चालकांनी रात्रीची स्वताला आणी वाहणाला विश्रांती घेण्या साठी महामार्गाच्या कडेला वाहने लावून चालक झोपी गेले होते याचा गैरफायदा घेऊन कराड येथून चारचाकी वाहनातून आलेल्या चाल तरुणांनी एका आयशर टेम्पोच्या डिझेल टाकीचे कुलुप तोडुन पाईपच्या साह्याने डिझेल काढण्याचे काम सुरु असतानाच भुईंज पोलिस ठाण्याचे पिएसआय रत्नदीप भंडारे वेळे ता.वाई येथील पोलिस मित्र पथकाने या टोळीवर झडप घातली आणी झालेल्या झटपटीत अंधाराचा फायदा घेऊन तीन डिझेल चोरणारे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक जण ताब्यात घेतला आहे .त्यांच्या कडून तीन मोठे कॅनसह १०० लिटर डिझेल आणी चोरीसाठी सोबत असणारे साहित्य जप्त केले आहे .
भुईंज पोलिस आणी वेळे ग्रामस्थांनी ताब्यात घेतलेल्या डिझेल चोराने आपले नाव अमोल श्रावण पाटील वय २७ राहणार वाठार ता.कराड असे सांगितले आहे त्यास भुईंज पोलिस ठाण्यात आणुन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे .महामार्गावर सतत डिझेलची चोरी होत असल्याने या चोरट्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे .तर पळून गेलेल्या ३ आरोपींना भुईंज पोलिस कधी गजाआड करणार या कडेही वेळे ग्रामस्थांन सह वाहन चालकांचे लक्ष लागुन राहिले आहे .