सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या “कृष्णाई" या नियतकालिकाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले व उपाध्यक्ष शंकरराव गाढवे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उत्कृष्ट संपादनाबध्दल संपादक मंडळाचे कौतुक केले.
या संमारंभाला संस्थेचे संचालक केशवराव पाडळे व सुरेश यादव, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व कृष्णाईचे संपादक, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
"कृष्णाई" नियतकालिकाच्या प्रकाशनसमारंभात बोलताना प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, "कृष्णाई" या नियतकालिकाला गौरवशाली परंपरा असून, शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये अनेकवेळा पहिल्या क्रमांकाची बक्षिसे प्राप्त केली आहेत. हा अंक अत्यंत दर्जेदार झाला असून तो वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक प्रो. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी मुखपृष्ठ व मुख्यपृष्ठाच्या संकल्पनेची माहिती दिली. नियतकालिकाच्या मराठी विभागाचे सहसंपादक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी नियतकालिकाच्या अंतरंगाविषयी माहिती देऊन, हा अंक विविधतेने नटलेला असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षाचा कालखंड हा कोरोनाचा असूनही नियतकालिकाच्या सातत्याची परंपरा कोठेही खंडीत होऊ दिलेली नाही.
मान्यवरांचे आभार नियतकालिकाच्या इंग्रजी विभागाचे सहसंपादक डॉ. अंबादास सकट यांनी
मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विलास करडे, नियतकालिकाचे सहसंपादक डॉ. शिवाजी कांबळे,
प्रा. दिपाली चव्हाण, प्रा. नीलम भोसले, प्रा. राहूल तायडे, प्रा. दिक्षा मोरे, नंदकुमार भोसले,
यशवंत जमदाडे, कार्यालय प्रमुख रघुनाथ शेलार, प्रमोद डेरे, जितेंद्र चव्हाण व सुनील
जंगम हे उपस्थित होते.