सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : प्रतिनिधी
बाबूर्डी येथील काळ्या ओढयावरील मोरगावला जोडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या एक कोटी चोवीस लाख रुपये किंमतीच्या पुलाचे उद्घघाटन आज बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. बाबूर्डी गावातून मोरगावला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा व सोयीस्कर मार्ग असून याठिकाणी ओढ्यावर पुल नसल्याने पावसाळ्यात लोकांची खूप मोठी गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेऊन गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून आणला आणी आज हा पुल वाहतूकीसाठी खूला करण्यात आला असल्यामुळे येथील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच अँड दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे, नानासो लडकत, मनिषा बाचकर, मंगल लव्हे तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे,माजी सरपंच अंकुश लडकत, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब लडकत, हौशिराम पोमणे, राजकुमार लव्हे, गोविंद भाचकर, लक्ष्मण पोमणे, योगेश जगताप, संतोष पोमणे,अशोक लव्हे, बापू पोमणे ,सागर पोमणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उद्घघाटन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर तसेच जिल्हा परिषद सदस्य भरतनाना खैरे यांनी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांच्या घरी जाऊन त्यांचे बंधू निलेश पोमणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले