भोर ! जीवनाच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्या : Adv.चंद्रकिरण साळवी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
सद्याचे युग धकाधकीचे असल्याने नागरिकांना आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही.त्यामुळे यैन तारुण्यात अनेकांना दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागत आहे.म्हणूनच नागरिकांनी इतर गोष्टींबरोबर जीवनाच्या प्रवासात आरोग्याकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी भोर येथे केले. 
         भोर येथील आरोग्य धनसंपदा हेल्थ अँड न्यूट्रिशन सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ऍड.साळवी बोलत होते.यावेळी वेलनेस कोच सुरेश शितोळे,जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,नगराध्यक्षा निर्मला आवारे,गीतांजली शेटे,हेल्थ कोच रोहिणी प्रदीप गोळे,रुपेश शिंदे,सचिन काकड,अश्विनी कड,आप्पा गोळे ,हेल्थ कोच प्रदीप गोळे आदींसह नर्हे येथील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी वेलनेस कोच सुरेश शितोळे यांनी आरोग्यविषयक नागरिकांना मार्गदर्शन केले.
To Top