बारामती ! 'मला आता पुढच्या वेळेस निवडून देऊ नका' ? ....! का म्हणाले असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
'मला आता पुढच्या वेळेस निवडून देऊ नका आता ह्याने जॅकेट घातलंय यालाच निवडून द्या....असे अजित पवार त्यांच्या स्टाईलने मिश्कीलपणे म्हणाले आणि सभागृहात हास्याचे फवारे उडाले. 
        वाघळवाडी ता बारामती येथे ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी सभेदरम्यान  अजित पवार भाषण करताना बोलत होते.  व्यासपीठावर उपस्थित असलेले  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य अँड हेमंत गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने जॅकेट घातले होते. हेमंत गायकवाड पाठीमागुन विकासकामाबाबत  माहिती सांगत होते यावर अजित पवार यांनी मागे वळून पहात जॅकेट घातल्याचे पाहून ...यालाच निवडून द्या म्हणत चिमटा काढला. 
वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साडेआठ कोटी निधीमधून पूर्ण झालेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांचे उदघाटन कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेल्या एक लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे, नूतनीकरण केलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे, गावातील अंतर्गत केलेल्या पेव्हर रस्त्याचे, अंबामाता-ज्योतीबा या सभामंडपाचे उदघाटन करण्यात केले.
                    ग्रामपंचायतीने केलेल्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, वाघळवाडीकरांनी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करा. विकासकामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आमची राहील. निरा बारामती रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. त्यामुळे अंतर सोडून कामे करा. पूर्वी निधी कमी असायचा आता आपल्याकडे निधीची कमतरता नाही. निधी कमी पडू दिला जाणार नाही. 
   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पुणे जिल्हा परिषदचे सभापती प्रमोद काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे उपस्थित होते.
        कार्यक्रमाप्रसंगी सोमेश्वर कारखान्याकडून  ग्रामपंचायतिला दरवर्षी मिळणाऱ्या महसुलात वाढ झालेल्या बावीस लाख रुपयांच्या चेकेचे वाटप अजित पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला केले.
      यावेळी व्यासपीठावर सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सतिश सकुंडे, अजिंक्य सावंत,गणेश जाधव, तुषार सकुंडे, सुचेता साळवे, पांडुरंग भोसले, चेतन गायकवाड, शिला सावंत, लता शिंदे, ग्रामसेवक नरसिंग राठोड , ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अँड हेमंत गायकवाड यांनी केले. उपस्थिताचे आभार राष्ट्रवादीचे शिक्षक सेलचे शहराध्यक्ष अविनाश सावंत यांनी मानले.
To Top