मेव्हणा-दाजी सांभाळणार पुणे जिल्हा कृषी औद्योगिक संघाची जबाबदारी : शहाजीराव काकडे यांनी तरुणांच्या हाती सोपवली जबाबदारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा कृषी-औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.पुणेच्या अध्यक्षपदी गौतम शहाजीराव काकडे तर उपाध्यक्षपदी दिग्विजय धन्यकुमार जगताप यांची बिनविरोध निवड पार पडली. तसेच संजयसिंह शिवाजीराव निंबाळकर यांची प्रेसिडेंटपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 
            सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष शहाजीराव काकडे तथा या संस्थेचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांनी ही जबाबदारी तरुणांच्या हाती सोपवली आहे. या संस्थेची पंचवार्षिक  निवडणुक बिनविरोध नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, मानसिंग जगताप, विजय  काकडे, विजय नलवडे, नारायण रणवरे,  मोहन  खोमणे, बाळासाहेब गायकवाड, हिरामण बनसोडे, अरुंधती निंबाळकर  आदी मान्यवर उपस्थित होते. 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष तळपे यांनी काम पाहिले
To Top