सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुढाळे ता बारामती येथे वि का सोसायटीच्या निवडणूक कारणावरून तिघांना जबर मारहाण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लालासो धोंडीबा जायपत्रे रा.जायपत्रेवाडी मुढाळे ता. बारामती जि. पुणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरून
सदाशिव केशव जायपत्रे, नामदेव रामचंद्र जायपत्रे, संतोष आबा जायपत्रे, अजित नामदेव जायपत्रे, संदीप संतोष जायपत्रे, अविनाश संतोष जायपत्रे, दादा सदाशिव जायपत्रे, सोनाली दादा जायपत्रे, शिवाजी रामचंद्र जायपत्रे 10) ताई शिवाजी जायपत्रे, विद्या अजित जायपत्रे, प्रवीण शिवाजी जायपत्रे सर्व रा.जायपत्रेवाडी मुढाळे ता. बारामती जि पुणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि २१ रोजी मुढाळे नजीक जायपत्रेवाडी येथे फिर्यादी यांच्या घरापुढे यातील वरील आरोपी यांनी वीर विकास सेवा सहकार सोसायटी ची निवडणूक जिकलेचे कारणावरुन फिर्यादीचे घरासमोर फटाके वाजवण्याचे व गुलालाची उधळण्याचे कारणावरुन बेकायदा गर्दी जमाव जमवुन आरोपी नं 1 ते 12 यांनी लोखंडी गज ,लाकडी दांडक्यांनी मारहाण करुन फिर्यादीचे कपाळावर ,पाटीवर व पायावर कीरकोळ व गंभीर दुखापत करुन, संतोष जायपत्रे हा विटेचा तुकडा घेऊन फिर्यादीचे अंगावर धावून आला व इतर आरोपी यांनी फिर्यादीस हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली त्यावेळी फिर्यादीची पत्नी संगीता व मुलगा राहुल असे दोघेजण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही वरील आरोपी मजकुर यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
सहाय्यक पोलीस फौजदार खोमणे
दाखल अंमलदार- पो हवा नागटीळक पुढील तपास करत आहेत.