भोर ! विसगाव खोऱ्यातील नेरे परिसरात रानगव्याचा गव-गवा : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव खोरे येथील नेरे-आंबाडे परिसरात एका रानगव्याचा वावर गेल्या दोन दिवसांपासून होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तर गव्याच्या भीतीने शेती कामे लांबणीवर पडली आहेत.
         रानगवा हा जंगली प्राणी मागील काळात मोठमोठ्या अभयारण्यात तसेच प्राणी संग्रहालयात पहावयास मिळत होता.मात्र रानगव्यांची जंगलात संख्या वाढल्याने गेले दोन वर्षांपासून गव्याचा मानवी वस्तीकडे मुक्त वावर होत असल्याचे चित्र आहे.भोर  तालुक्यात मागील एक महिन्यांपूर्वी पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा येथे दोन रानगवे दिवसा रस्ता पार करताना नागरिकांच्या निदर्शनास आले होते.तर शनिवार दि-२६ रात्री नऊच्या सुमारास भोर-आंबाडे मार्गावरील नेरे गावच्या जिल्हा परिषद शाळे लगतून भला मोठा गवा रस्ता पार करून शिवारात गेल्याचा वाहन चालकांना निदर्शनास पडला.यामुळे भोर तालुक्यात दोन महिन्यात गवा नागरिकांच्या निदर्शनास पडण्याची दुसरी घटना आहे.नेरे गावाशेजारून गव्याचा वावर होत असल्याची माहिती परिसरातील गोकवडी,निळकंठ, बालवडी,आंबाडे,वरवडी,खानापूर,धावडी,बाजारवाडी,पळसोशी,पाले गावच्या नागरिकांना मिळाल्याने रब्बीतील पिकांची कापणी सुरू असतानाही शेतकरी गव्याचा भीतीने शेती काम करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
---------------------
सावधान....! नेरे परिसरात एक रानगव्याचा वावर 
 नेरे परिसरात दोन दिवसांपासून गव्याचा वावर आहे.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या रानगव्यास डोंगर भागाकडे हाकलून लावलेला आहे.हा गवा पुन्हा मांववस्तीकडे येईल असे वाटत नाही.तरीही नागरिकांनी तसेच शेती काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी व रानगवा दिसल्यास वनविभागास कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी केले आहे.
----------------------
२५ वर्षांनंतर रानगव्याचा विसगाव खोऱ्यात पुन्हा वावर
विसगाव खोऱ्यात मागील २५ वर्षांपूर्वी असाच एक रानगवा निदर्शनास पडला होता.या रानगव्याने खानापूर येथील एका बुजुर्ग सायकल स्वरास धडक दिल्याने ती व्यक्ती मोठ्या प्रमाणावर झकमी झाली होती.त्यानंतर २५ वर्षांनी पुन्हा रानगव्याचा वावर असल्याने नागरिक घाबरून गेले आहेत.

                                
To Top