सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीची चुणूक,पक्षात कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन भोर तालुक्यातील शिवसेना ,रासप व काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यात बळ वाढणार आहे.
भोर येथील शिवसेना पक्षाचे माजी तालुकाप्रमुख युवराज जेधे, माजी नगरसेवक व माजी युवासेना तालुकाप्रमुख केदार देशपांडे,शिवसेना महिला माजी विभागप्रमुख मिनाक्षी गावडे(पाटील), शिवसेनेचे विशाल तुंगुतकर,प्रशांत खुडे,सिकंदर ढवळे,अभय तुपे, नाना जेधे, सचिन जेधे, भोर तालुका रासपचे तालुकाध्यक्ष मारुती गोरे, उपाध्यक्ष रामभाऊ कचरे,युवकाध्यक्ष हनुमंत गोरे, काँग्रेसचे रामचंद्र कुमकर,रामचंद्र गुरव यांच्यासह भोर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांचे हस्ते व जिल्हा परीषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, मा.गटनेते यशवंत डाळ, मा.नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,मा.उपसभापती सुनिल भेलके, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रविंद्र बांदल,मा,जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, शहराध्यक्ष नितिन धारणे,युवकाध्यक्ष गणेश खुटवड तसेच भोर तालुका व शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.