सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
एकोपा असला की राजकारण सुद्धा सोपे होते हे निंबूत ग्रामपंचायतीअंतर्गत फरांदेनगर (ता. बारामती) येथील ग्रामस्थ गेली चाळीस वर्षे दाखवून देत आहेत. त्यांच्या अतूट एकोप्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने मागील चाळीस वर्षांची बिनविरोध परंपरा यावेळीही कायम राखली.
निंबुतनजीक फरांदेनगर ही छोटी वस्ती आहे. घरोघरी उचचविद्याविभूषित व प्रगतिशील शेतकरी आहेत. वस्ती पूर्ण बंगले दिसतात कारण राजकारण बाजूला ठेवून ते अर्थकारण करतात. . महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्यानमाला, निंबूतभूषण पुरस्कार अशा परंपरा ग्रामस्थांनी जपल्या आहेत. यासोबत सोसायटीची निवडणूकही गेली चाळीस वर्ष बिनविरोध करत आहे.
ग्रामस्थांनी चालू निवडणूक करतानाही तेरा जागांसाठी तेरा नावे निश्चित केली आणि तेवढेच अर्ज दाखल केले. त्यामुले निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. गोलांडे यांनी तेरा जणांना बिनविरोध संचालक म्हणून जाहीर केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ - सर्वसाधारण - दिलीप प्रभाकर फरांदे, सुनिल ज्ञानोबा क्षीरसागर, संभाजी धोंडिबा फरांदे, शत्रुघ्न अण्णा कोरडे, सचिन गणपत रासकर, निखिल लक्ष्मण फरांदे, अजित सुधाकर गार्डे, दत्तात्रेय महादेव जमदाडे
महिला - सोनाली दीपक दुर्गुडे, उषा अप्पासो फरांदे भटक्या विमुक्त जाती जमाती - अतुल दादासो लकडे इतर मागास - दत्तराज जगन्नाथ फरांदे अनुसूचित जाती जमाती - उत्तम किसनराव आगवणे