सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथील भगवाननाना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात ज्येष्ठ ग्रामस्थांना यश मिळाले.
भगवाननाना सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर तरूण इंच्छुकांची गर्दी वाढली होती. परंतु सोमेश्वर काऱखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मदने, विद्यमान संचालक शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, प्रगतशील शेतकरी ऋतुराज काकडे, सरपंच भाग्यश्री धनंजय गडदरे आदींनी बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर एकोप्याने निवडी पार पडल्या अनुसूचित जाती जमाती ही जागा रिक्त राहिली. तेरापैकी बारा जागा बिनविरोध झाल्या.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे -
सर्वसाधारण गट - ऋतुराज रतनराव काकडे, त्रिंबक यशवंत सावंत, रामदास बबन लकडे, दादा रावबा धायगुडे, बापूराव चांगदेव लकडे, अविनाश बबन मदने, विजय भिकू मदने, हनुमंत किसन गडदरे
भटक्या विमुक्त जाती जमाती - राजेंद्र दादासाहेब लकडे इतर मागासवर्ग - पांडुरंग गुलाब कोरडे
महिला प्रतिनिधी - रोहिणी सुरेश पिंगळे, अमृता ऋषिकेश काकडे