विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ पाडव्याच्या मुहर्तावर करणार : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप

Pune Reporter

सोमेश्वर रिपोर्टर टीम  
सोमेश्वरनगर 
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पुर्णत्वास आले असुन येत्या पाडव्याच्या शुभमुहर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवारसो यांचे शुभहस्ते कारखाना विस्तारवाढ प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

 जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, चालु गळीत हंगामाकरीता १५७ दिवसांमध्ये प्रतिदीन ६३०० मे. टनाचे सरासरी गाळप करुन कारखान्याने आजअखेर ९ लाख ९१ हजार ८२४ मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असुन यातुन सरासरी ११.६४ टक्केचा साखर उतारा राखत ११ लाख ४९ हजार ५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर ७ कोटी ४१ लाख ७२ हजार ६६९ युनिट्स वीजनिर्मिती केली असुन ४ कोटी ५४ लाख ७१ हजार ३६ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातुन आजअखेर ७५ लाख २७ हजार ४६ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन ३२ लाख ३९ हजार ८२६ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

 जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याचा विस्तारीकरण प्रकल्प प्रत्यक्षात सुरु करणेसाठी आवश्यक असणारे सर्व चाचण्या पुर्ण झाल्या असून यामध्ये हायड्रोलिक ट्राईल, व्हॉक्युम ट्राईल, स्टीम ट्राईल या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. आपला विस्तारीकरण प्रकल्प पुर्ण झालेनंतर आपण प्रतिदीन ८५०० मे. टनाने गाळप करणार असुन यामुळे सध्या कारखाना कार्यक्षेत्रात उभा असलेला संपुर्ण नोंदलेल्या ऊसासह बिगर नोंदिचा ऊससुद्धा आपण येत्या ४५ दिवसात गाळप करणार आहोत.

  कार्यक्षेत्रातील, बिगर नोंदिचाही आपण संपुर्ण ऊस गाळपास आणणार असल्याने याबाबत सभासदांनी निश्चित रहावे तसेच त्याकरीता ज्यांची ज्यांची ऊसनोंद दयावयाची असेल त्यांनी गट ऑफीसमध्ये जावुन तात्काळ नोंदी दयाव्यात जेणेकरुन त्यांच्या बिगरनोंदीच्या ऊसाचे तोडीचे नियोजन कारखान्यास करता येईल.

  वाढत्या उन्हाचे व इतर काही कारणे देत ऊसतोड मजुर हे काही ठिकाणी तोडीस पैसे मागत असल्याच्या तक्रारी कारखान्याकडे येत आहेत. तरी याद्वारे सर्व सभासदांना पुनश्चः सुचित करण्यात येत आहे की, कारखान्यामार्फत तोडणी वाहतुक करणार्या यंत्रणेस सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येते त्यामुळे जर कोणी शेतकर्यांकडे तोडीसाठी पैशाची मागणी करीत असेल तर तसे लेखी तक्रार कारखान्याच्या शेतकी अधिकार्यांकडे करावी.
To Top