'बारामती'च्या 'सुपुत्रा'ची लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारीपदी पदोन्नती : या पदाला गवसणी घालणारे जगन्नाथ लकडे तालुक्यातून एकमेव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ता बारामती येथील तसेच बारामतीचे तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना पदोन्नती मिळाली असून ते आता लातूर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 
          लकडे यांनी २० वर्ष भारतीय सेनेत सेवा केल्यानंतर ते सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाले. श्रीलंका येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवले होते. त्यानंतर ते क्रीडा अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले. त्यांनी सुरुवातीला मुंबई येथे 
कुर्ला, अंधेरी, बोरविली, भोर, वेल्हा, पुरंदर व  बारामती तालुक्यात क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 
        आता त्यांची लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. असा बहुमान मिळवणे ते बारामती तालुक्यातील पाहिले क्रीडा अधिकारी आहेत.
To Top