पुरंदर ! जेऊर गावचे सुपुत्र डॉ. दिपक आबनावे यांची जर्मन फेलोशिपसाठी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
जेऊर (ता. पुरंदर) येथील  डॉ. दिपक आबनावे यांना जर्मनी देशातील विद्यापीठाची अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी दाड (DAAD) फेलोशिप (शिष्यवृती) साठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वीही २०१४ मध्ये डॉ. आबनावे यांना प्रथम दाड फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.
         डॉ आबनावे हे जर्मनीच्या 'युनिव्हर्सिटी ऑफ उझ्बर्ग दाड फोरम'चे प्रतिनिधी आहेत. यावर्षी 'युनिव्हर्सिटी ऑफ उझ्बर्ग दाड फोरम' यांनी जुलै २०२२ मध्ये आठ दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत 'creating change - sustainable working, living and doing research'  या विषयावर जागतिक पातळीवरील निवडक विचारवंत चर्चा करणार आहेत. यासाठी जगभरातून ३० प्रतिनिधीना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भारतातून महाराष्ट्रात विविध सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या डॉ. दिपक आबनावे यांची निवड करण्यात आली आहे. 
           डॉ दिपक आबनावे हे पुरंदर तालुक्यातील जेऊर गावच्या अल्पभूधारक शेतकरी कुटूबांतील आहेत. जेऊर विद्यालय, काकडे महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. कर्वे इन्स्टिट्यूटमधून एमएसडब्लूचे तर नवी दिल्ली येथील जेएनयु (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) मध्ये पीएचडी पदवी घेतली आहे. सोशल मेडीशीन या विषयात त्यांनी संशोधन केले. त्यांनंतर त्यांनी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) च्या राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई या संस्थेच्या प्रकल्पावर संशोधक  म्हणून कार्य केले आहे. सद्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, तुळजापूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येथे सामजिक आरोग्य व’ सामाजिक संशोधन हे विषय शिकवतात. त्यांच्या या निवडी बद्दल संस्थेचे डीन प्रा. रमेश जारे आणि प्राध्यापक सहकारी यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
To Top