बारामती ! वडगाव निंबाळकर चे सरपंच ग्रामसेवक यांचेवर कारवाई करा : प्रांताधिकारी यांचेकडे तक्रार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत वडगांव निंबाळकर येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर  कायदेशीर कारवाई करा अशी मागणी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत चे सदस्य संजय श्रावण साळवे यांनी बारामतीचे प्रांताधिकारी यांचेकडे केली आहे.
            संजय साळवे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हणटले आहे की,  ग्रामपंचायत वडगांव निंबाळकर यांचे वतीने दिनांक ०६/०३/२०२२ ते ०८/०३/२०२२ या कालावधीत जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमावेळी स्टेजवर महिला महामानवांच्या प्रतिमा लावुन त्यांचे आदरयुक्त पुजन करण्यात आले. परंतु त्यामधुन जाणुन बुजून, ठरवुन जातीय व्देषातुन माता रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली नाही. त्यामुळे गावातील आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये महामानवांचा अपमान करणे ही खुप निंदनीय बाब आहे. तरी या सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच हे वरील घटनेस सर्वस्वी जबाबदार असुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे अर्जात म्हंटले आहे. 
           बारामती तालुक्यातील नावाजलेली ग्रामपंचायत परंतु वेळोवेळी होणाऱ्या तक्रारी त्या मध्ये  मंगळवार रोजी ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त, स्त्री जागर महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्सवात करण्यात आले. महिलांसाठी विविध कार्यक्रम, सत्कार,सन्मान सोहळा करण्यात आला.या कार्यक्रमावेळी सर्व थोर महिलांचे फोटो लावून त्यांचे पूजन करण्यात आले. परंतु माता रमाई यांचा कोणी नामोल्लेख केला नाही. त्यांचा फोटो लावण्यात आला नाही किंवा त्यांचे आजच्या दिनी अभिवादन करण्यात आले नाही.  ही खूप गंभीर बाब असून वडगाव निंबाळकर चे रहिवासी वडगाव ग्रामपंचायत चा माजी सरपंच व  सदस्य संजय श्रावण साळवे, अभिजित साळवे यांच्या तर्फे तसेच  मित्र परिवारातर्फे या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात आला व ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर च्या मनमानी कारभाराचा व आयोजकांचा जाहीर निषेध केला.
To Top