सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

खंडाळा ! शिरवळ पोलिस ठाण्यातील तीन पोलिस एक होमगार्ड निलंबित : सातारा पोलिस दलात खळबळ

सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
वाई : दौलतराव पिसाळ
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी असणाऱ्या वसतिगृहामध्ये घुसून विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यासहित एका होमगार्डला निलंबित करण्यात आल्याची माहिती सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. 
        दरम्यान, पोलीस मारहाणीच्या निषेधार्थ शिरवळसह राज्यामधील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत पोलीसांना पोलीस सेवेमधून बडतर्फ करण्याची मागणी करीत आंदोलन चालूच ठेवले आहे.
     याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. दरम्यान,९ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे,बी.सी.दिघे,चालक डी.ए. धायगुडे,होमगार्ड मनोज नरुटे यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश करीत वसतिगृहातील रूममध्ये असणाऱ्या तब्बल १७ विद्यार्थ्यांना अमानुषपणे काठीच्या साहाय्याने जोरदार विनाकारण मारहाण केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.  यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीमुळे काठ्यांचे व्रण उठले असून आज शिरवळ पोलीसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरवळ क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय ,परभणी,उदगीर,मुंबई,नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी निदर्शने करीत जोरदार आंदोलन करीत पोलीसांच्या कारवाईच्या निषेधार्थ संबंधितांना पोलीस सेवेमधून बडतर्फ व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक रहिवाश्यानी वसतिगृहातील विद्यार्थी गोंधळ घालत आहे अशी तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस वसतिगृहात गेल्यानंतर सदरील गोंधळ व मारहाण झाल्याची माहिती शिरवळ पोलिसानी दिली आहे.
  दरम्यान, यावेळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,खंडाळा तहसीलदार दशरथ काळे,शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने,सहाय्य्क पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार ,क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी विद्याथ्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाई करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे,बी.सी.दिघे,चालक डी.ए. धायगुडे,होमगार्ड मनोज नरुटे यांना निलंबित केल्याचे लेखी आदेश विद्यार्थ्यांना व महाविद्यलयाला उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी दिल्यानंतर विद्यार्थी यांनी नरमाईची भूमिका घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पालक आल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू असे संगत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत आंदोलन चालूच ठेवले. दरम्यान, संपूर्ण प्रकारांची चौकशीकरिता वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे-खराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7035,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : खंडाळा ! शिरवळ पोलिस ठाण्यातील तीन पोलिस एक होमगार्ड निलंबित : सातारा पोलिस दलात खळबळ
खंडाळा ! शिरवळ पोलिस ठाण्यातील तीन पोलिस एक होमगार्ड निलंबित : सातारा पोलिस दलात खळबळ
https://lh3.googleusercontent.com/-RZXEPnvAx3I/Yit8DtZMwNI/AAAAAAAANmM/Dc61uRwtRxQFDIFWVRddYogMk18tyBHLgCNcBGAsYHQ/s1600/1647016931010835-0.png
https://lh3.googleusercontent.com/-RZXEPnvAx3I/Yit8DtZMwNI/AAAAAAAANmM/Dc61uRwtRxQFDIFWVRddYogMk18tyBHLgCNcBGAsYHQ/s72-c/1647016931010835-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/03/blog-post_63.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/03/blog-post_63.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy