सुपे परगणा ! दंडवाडी गावात २० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या २० लाख रुपये किंमतीच्या रोडचे भूमीपूजन आज बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
        यावेळी पंचायत समिती सदस्य निता बारवकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराव चांदगुडे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकतभाई कोतवाल,सरपंच मनिषा चांदगुडे भोंडवेवाडी गावचे उपसरपंच राहुल भोंडवे, महेश चांदगुडे, उद्योजक हनूमंत चांदगुडे, रोहन सरोदे ,अजित चांदगुडे उपस्थित होते यावेळी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे संभाजी होळकर यांनी सांगितले फक्त ग्रामपंचायतींनी कामे दर्जेदार करुन घ्यावी असे आदेश दिले.
To Top