महिला दिन ! जुबिलंट येथे महिला बचत गटाच्या मोहोत्सवास उदंड प्रतिसाद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : वार्ताहर 
नीरा (ता.पुरंदर) येथे महिला दिनानिमित्त येथील ज्यूबिलंट भारतीया फाउंडेशन तसेच निरा- निंबुत  परिसरातील बचत गट व ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
         यावेळी विविध खाद्यपदार्थ, कपडे, मसाले, हातमाग वस्तू,  बर्फाचा गोळ्यांचे आदींचे सुमारे ३६ स्टॉल उभारण्यात आले होते. यास निरा व परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. लहान मुलांना खेळण्यासाठी मिकी माउस देखील होता. दरम्यान ज्यूबिलंट भारतीया फाउंडेशनकडून निंबुत येथील गोकुळ स्वयंसहायत बचत गटास ५००००/- चा चेक मान्यवरांच्या हस्ते  सुपूर्त करण्यात आला.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंती रोहित पवार होत्या तर प्रमुख पाहुण्या बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या होत्या. या कार्यक्रमास जुबिलंट कंपनीचे उपाध्यक्ष सतीश भट उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, निंबुतच्या सरपंच निर्मला काळे होत्या  याकार्यक्रमाचे आयोजन निकिता महामुनी, हंसप्रभा पोतदार, राधा माने, रेवती भोसले, तनुजा शहा, सविता दुर्वे, स्वाती काकडे, संगीता जगताप, सुनीता भादेकर, जया काळे यांनी केले.
      यावेळी भारतीया फाउंडेशनचे अजय ढगे, इसाक मुजावर, सुब्ह्मन्यम भट, निशांत फड, राजेद्र राघव ,दिपक सोनटक्के, मधुकर घोगरे, सुर्यकांत पाटील हे उपस्थित होते. तसेच या मोहत्सवास निरेचे उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अभिषेक भालेराव यांनी मोहत्सवास भेट दिली.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी केले तर आभार अजय ढगे यांनी मानले.
To Top