बारामती ! तू आमच्या विरोधात कोर्टात दावा का दाखल केला म्हणत एकास मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
तू आमच्या विरोधात जमिनीचा दावा कोर्टात का दाखल केला असे म्हणत दोघांनी एकाला मारहाण करत जखमी केल्या प्रकरणी दोघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
          याबाबत बाळासो विश्वनाथ भांडवलकर  रा. सोमेश्वर मंदिराजवळ देउळवाडी ता. बारामती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. 
पोलिसांनी राजेंद्र अरूण भांडवलकर व विवेक विलास भांडवलकर दोन्ही रा. सोमेश्वर देउळवाडी ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दि २६ ऐवजी सोमेश्वर देवस्थान येथे शेतजमीन गट नंबर २२९ मध्ये रस्त्याचे कडेला मकेच्या पिकात दारी धरत असताना यातील आरोपी नं १ व २ यांनी फिर्यादीस तु आमचे  विरोधात कोर्टात जमीनीचा दावा का दाखल केला आहे असे म्हणुन आरोपी नं १ याने लोखंडी राँडने फिर्यादीचे उजवे हाताचे कोप-यावर व डावे हाताचे बोटावर मारून फॅक्चर केले व ,आरोपी नं.२ याने लाकडी काठीने आपखुशीने मारून किरकोळ व गंभीर दुखापत करून घरातील लोकांना जिवंत मारण्याची धमकी देवुन तेथुन निघुन गेले आहेत म्हणुन फिर्यादीची त्याचे विरूध्द कायदेशिर फिर्याद आहे. वगैरे मजकुरावरून गुन्हा रजि.दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.न्यायालयात पाठविण्याची तजविज ठेवली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शेलार सो  हे करीत आहेत
To Top