सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
सुपे ता बारामती येथील जिल्हा बँकेत असलेल्या सोनेतारण कर्जाची नोटीस पाठवली म्हणून एकाने चिडून जाऊन बँकेतील कर्मचाऱ्याला जबर मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दत्तात्रय पांडुरंग कदम ( PDCC बॅक सुपा) माळेगाव बु ता. बारामती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी अभिनय उर्फ काका कुतवळ.रा सुपा ता बारामती जि. पुणे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.
दि २९ रोजी सुपे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत येवून आरोपीचा नातेवाईक सागर अरविंद कुतवळ रा कुतवळवाडी ता बारामती जि पुणे यास सोनतारण कर्जाची नोटीस दिलेचे कारणावरून आरोपी मजकुर याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहान करून उजवा हात पिरगळुन खुर्चीवर ढकलुन देवुन खुर्चीवर वरून खाली फर्शिवर पडुन खुर्ची उजवे हाताचे बोटावर मारून त्यात फिर्यादीचा उजवा हाताची कंरगळी फॅक्चर करून जखमी केले आहे म्हणुन फिर्यादीची त्याचे विरूध्द कायदेशिर फिर्याद आहे. वगैरे मजकुरावरून गुन्हा रजि.दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.न्यायालयात पाठविण्याची तजविज ठेवली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शेख सो हे करीत आहेत
------------------