सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम शिंदेवाडी येथे विना परवाना दारुची विक्री होत असल्याची माहीती खबर्या मार्फत वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना प्राप्त होताच त्यांनी डिबी विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने कॉस्टेबल अमीत गोळे श्रावण राठोड यांना बोलावून त्यांचे पथक तयार करुन वरील ठिकाणी सापळा रचून तातडीने छापा टाकण्याचे आदेश दिल्याने हे पथक भर दुपारी आडीच वाजता दारु अड्यावर पोहचले त्या ठिकाणी सापळा लावला असता एक २६ वर्षीय महिला दारुच्या बाटल्यांची खुलेआम विक्री करताना सापडली तिला पथकाने ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणुन तिच्या विरुद्ध पथकातील पोलिस कॉस्टेबल अमीत गोळे यांनी तक्रार दाखल केली आहे .
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम शिंदेवाडी येथे गेल्या दिड वर्षा पासून एक २६ वर्षीय महिला परिसरातील जबाबदार गाव कारभारी यांच्या पाठिंब्यावर दारुची विना परवाना राजरोस पणे मी पोलिसांना हप्ता देऊन भरदिवसा विक्री करीत असते असे लोकांना सांगुन धंदा तेजीत करत असलेच्या तक्रारी गेल्या दिड वर्षा पासून वाई पोलिस ठाण्यास
प्राप्त होत होत्या या वर वाईच्या डिबी पथकाने
या दारुच्या धंद्यावर छापा टाकण्या साठी अनेकदा सापळे लावले पण यश येत नव्हते.
पण वाई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून हजर झालेले पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना डिबी पथकाने या दारुच्या धंद्याची सविस्तर माहिती दिली .भरणे यांनी धोम शिंदेवाडी येथे स्वताचे बुध्दी कौशल्य वापरून खबर्यांची टोळी तयार करुन अखेर फीट माहिती प्राप्त करुन घेतली आणी त्या माहितीच्या आधारे वरील डिबी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले होते .अखेर या डिबी तब्बल दिड वर्षाच्या प्रतिक्षे नंतर पथकाने छापा टाकुन संमधीत महिला दारु विक्री करताना रंगे हात पकडली .
पण दारुचा साठा कोठे ठेवला आहे याची माहिती संमधीत महिला देत नसल्याने डिबी पथक देखील हतबल झाले होते अखेर या पथकातील पोलिस कर्मचार्यांनी बुध्दी कौशल्य
वापरून तिच्या घरा शेजारी असणारा शेणाचा
उकीरडा खोदण्याचे काम सुरु केले तीन फुट खोलवर उकीरडा खोदल्यावर त्यात एक पांढर्या रंगाचे पोते सापडले त्यात तब्बल १८० मीलीच्या चार हजार रुपये किमतीच्या ६८ देश दारुच्या बाटल्या सापडल्याचा आनंद या पथकातील पोलिस कर्मचार्यांच्या चेहर्यावर दिसत होता .पण महिला ताब्यात घेताच मागेल एवढे पैसे देतो पण पोलिस केस करु नका व महिलेला सोडुन द्या असे शेकडो फोन विविध राजकीय पुढार्यांचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे व डीबी पथकाला येऊ लागल्याने पथक आणी भरणे हे चक्रावुन गेले बाळासाहेब भरणे आणी डिबी पथक कुठल्याही अमीशाला बळी न पडल्याने मिशन
दारु अड्या ऊध्दस्त करणे हे सफल झाले.पण
त्या मुळे वाईच्या पश्चिम भागात अवैद्य सुरु
असलेल्या धंदेवाल्यान बरोबर काही राजकीय मंडळी आर्थिक उलाढाली करून पाठबळ देणार्यांची यादी बाकी भरणे आणी डिबी पथकाच्या हाती लागल्याने वाईच्या पश्चिम भागात एकच खळबळ उडाली आहे .