सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ .
महाबळेश्र्वर भिलार येथे राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशन नाईट प्रो फाईट पार पडल्या या स्पर्धेमध्ये दिल्ली, गोवा, केरळा, महाराष्ट्र ,झारखंड, ओरिसा, आसाम, राजस्थान, हरियाणा, पंजाब ,जम्मू काश्मीर, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक तमिळनाडू अशा विविध राज्यातून 367 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धांमध्ये केडीट सब जूनियर , ज्युनिअर फाईट व प्रोफाई ट प्रमाणे पार पडलेल्या या स्पर्धेत सातारची सेंट थॉमस स्कूलची सना वजीर शेख हिने वयाच्या तेराव्या वर्षी प्रोफाईट टायटल बेल्ट सिनियर फायनल गटात हरियाणा फायटर वरती विजय मिळव ला या स्पर्धेत सातारच्या मुलींनी विविध गटात यश प्राप्त केले .तीर्थ देशमुख, जावेद मुजावर ,स्वरा चिकणे, नाझमा शेरकर,साई धायगुडे अनिरुद्ध वाडकर, सोहम वाडकर सना शेख, यांनी सुवर्णपदक प्राप्त केले व श्री जीत बात्रा शंतनू कदम, कुणाल ढेरे, अवंतिका शिंदे यांनी रौप्य पदक पास केले यां खेळाडूंना सफीया शेख, रविराज गाढवे ,राष्ट्रीय पंच वजीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी वाई खंडाळा महाबळेश्वर चे युवा नेते विजय पिसाळ ग्रा, प,सदस्य पैलवान तानाजी कचरे सामाजिक कार्यकर्ते संतोष दुदुस्कर थाई बॉक्सिंग असोसिएशन चे कुलजीत सुमनकर , सातारा थाई बॉक्सिंग असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष वजीर शेख पीटीआय अजित वाडकर सचिन तीमुंकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक चॅम्पियन महाराष्ट्र, ओरिसा आणि आसाम व चतुर्थ ट्राफि गुजरात यांनी पटवली इंद्रजीत राजा,जमीर शिकलगार, नाबिजी फरान ,निधी प्रियंका ,तृप्ती अजय खेडकर यांनी काम पाहिले श्री संतोष खेरणार यांनी सूत्रसंचालन केले तर स्वागत सफिया शेख यांनी केले.