८६ टन ऊसबिलापोटी तब्बल २ लाखाची फसवणूक : वडगाव निंबाळकर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---   
सोमेश्वरनगर : प्रतिनिध
उसाचे पैसे देतो म्हणून बारामती तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना तब्बल दोन लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        याबाबत बबन निवृत्ती तावरे  रा मोरगाव ता.बारामती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी  विनोद उर्फ पप्पु लक्ष्मण तावरे रा.मोरगाव ता.बारामती व  इमरान उर्फ बाबु उसमान संय्यद रा. बोरीपार्धी ता.दौड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
           पोलिसांनी दिलेल्या आजपर्यंत वेळोवेळी मोरगाव ता.बारामती जि.पुणे यातील आरोपी  याने मोरगाव ता.बारामती जि.पुणे गावचे हाद्दीत फिर्यादीचे मालकीचे जमीन गट नं ४४८ मधील ३० गुंठयामधील ४७ टन उस याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून 
१ लाख ८ हजाराचा ऊस नेला. हे पैसे  त्यास वेळोवेळी मागीतले असता त्याने सदरचे पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच बापु ज्ञानेदव तावरे, याचा १० टन उस , युवराज श्रीरंग तावरे, यांचा १९ टन उस, नवनाथ बाळासो तावरे याचा १० टन उस असा एकुण ३९ टन उस किंमत  ९३ हजार ५०० रुपयांचा  ऊस विश्वासात घेवुन ऊस तोडुन नेवुन आज रोजी पर्यत पैसे न देता आमचा ८६ टन उस किंमत २ लाख १ हजार ५००  रूपयाची फसवणुक केली आहे.
To Top