सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावर साताऱ्याकडून पुणेकडे जाताना तांत्रिक बिघाडामुळे भाडे तत्त्वावरील सांगली पुणे शिवशाही एमएच १४ जियु २३१० या बसने निगडे ता.भोर गावानजीक अचानक पेट घेतला.यात नशीब बलवत्तर म्हणून सर्व प्रवाशी,वाहक व चालक सुखरूप बाहेर निघाले.मात्र बस जळून जागीच खाक झाली.
सोमवार दि-१४ दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना घडली असून बस जळून खाक झाली आहे.यावेळी काही वेळ महामार्गावरील वाहन चालक भग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.मात्र महामार्ग व राजगड पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहचून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.तर स्थानिक नागरिकांनी आग विजवण्याचा पर्यटन केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात अली नाही.