सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जावली : धनंजय गोरे
जावली तालुक्यातील प्रतिष्टेची झालेली व जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम असणाऱ्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी मधे जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पैनल ने जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्या कारखाना बचाव पैनल चा सर्वच गटात धुव्वा उडवित 21-0 अशी विजयी बाजी मारत पुन्हा एकदा प्रतापगड कारखाण्यावर वर्चस्व मिळविले.
आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार मकरंद पाटिल, माजी आमदार सदाशिव सपकाळ या आजी माजी आमदारांची ताकद संस्थापक पैनल च्या पाठीशी उभी राहिली व तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी एकत्र येत संस्थापक पैनल ला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली ऊस उत्पादक सभासद व कामगार यांनी हाती घेतलेल्या निवडणुकीमधे संस्थापक पैनल चे तिन उमेदवार आधी बिनविरोध झाले होते आणि नंतर 18 जागेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदान मधे 6056 पैकी 3215 सभासदानी मतदानाचा हक्क बजाविला 52% टक्के झालेल्या मतदान मधे मतमोजनी मेढा ता. जावली या ठिकाणी सकाळी आठ वाजल्या पासून सुरु झाली यात पहिल्या फेरी पासूनच संस्थापक पैनलने आघाडी घेत सर्वच जागांवर एकतर्फी विजय मिळविला.
प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीतील विजया नंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सौरभ शिंदे म्हणाले, विजय हा नक्कीच होता,काका व भैय्यांच्या विचारांचा विजय झाला असून त्यांचा विचार पुढे घेवून जाण्याचे काम संस्थापक पैनल करणार असून कारखाना पुढील हंगामात चालू करण्याचे उद्धिष्ठ आम्हा सर्व संचालक मंडळाचे राहिल,