सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ली.या राष्ट्रीय सराफ संस्थेच्या वतीने मुंबई येथे आंतरराष्ट्रीय सुवर्ण परिषद पार पडली, आता पर्यंत च्या इतिहासात महाराष्ट्रातुन असोसिएशन साठी, सराफ सुवर्णकारांसाठी सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष आणि इब्जा चे समन्वयक किरण आळंदीकर आणि विजय लष्करे यांचा मुंबई येथे विशेष समारंभा मध्ये गौरव करण्यात आला. इब्जा चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, पदाधिकारी हरेश खोसला आणि तानिया रसतोगी यांनी त्यांना सन्मानित केले.
इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशन च्या वतीने आयोजित केलेल्या या सुवर्ण परिषदेला भारताच्या सर्व राज्याचे पदाधिकारी, वर्ल्ड गोल्ड कौन्सील, नॅशनल स्टॉक एक्सेज ( एन. एस. ए ) चे पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या आतापर्यंत च्या कारकिर्दी मधील हा सर्वात मोठा सन्मान असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.