बारामती ! वाघळवाडी येथील एस डी. सह्याद्री पब्लिक स्कूल CBSE मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दि १२ मार्च रोजी सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.         मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात कोरोना चा कहर या विषयावर प्रकाश टाकणारी थीम ,देव भक्ती पर गीते, पावनखिंड थीम ,मनोरंजनात्मक गाणी, महाराष्ट्रीयन पारंपारिक गाणी, लहान मुलांवर मोबाईलचे होणारे दुष्परिणाम याचे चित्रं दाखवणारे नाटक अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा म्हणून कार्यक्रमाचे युट्युब वर लाइव्ह प्रक्षेपण ठेवण्यात आले होते, त्यामुळे घरी असूनही पालकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. दोन वर्षानंतर या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वाघळवाडीच्या सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच  जितेंद्र सकुंडे हे उपस्थित होते.         कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत ,धनश्री सावंत व  रोहिणी सावंत यांची उपस्थिती अवर्णनीय होती. कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य  अजित वाघमारे यांनी मार्गदर्शन केले होते. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाचे शिक्षक शितल पवार, आयुषा सूर्यवंशी , अनुराधा खताळ  इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा मदने व दिपाली गायकवाड तसेच शाळेतील विद्यार्थी हरिओम खोमणे व हर्ष माने यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
To Top