सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसा पुर्वी ओझर्डे गावातील काळुबाईचा माळ येथे विध्दुत तारांन मध्ये शॉकसर्कीट होऊन त्याच्या ठिणग्या ऊसाच्या फडात पडुन लागलेल्या आगीत चार शेतकर्यांचा अंदाजे साडेचार एकर ऊस जाळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती वाई येथील विध्दुत मंडळाच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर आणी ऊप कार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांना समजताच या दोन्ही ही अधिकार्यांनी याची माहिती मुख्य कार्यालय सातारा येथील सहाय्यक अभियंता विध्दुत निरीक्षक असलेले दि.प्रा .भोरे यांना बोलावून घेऊन वरील तीनही जबाबदार अधिकार्यांनी जळीत झालेल्या ऊसाची पाहणी करुन जळीत ग्रस्त शेतकर्यांना भेटुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्याच्या मावळलेल्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्याचे दिसुन आले .
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की ओझर्डे ता.वाई गावच्या हद्दीतील टाकुबाईचा माळ परिसरात कवठे येथील विध्दुत मंडळाचे शाखाधीकारी यांच्या गलथान कारभारा मुळे उसाच्या फडात हाताला लागतील एवढ्या अंतरावर लोंबकळत असलेल्या विज वाहक तारांन मध्ये शॉकसर्कीट होऊन त्याच्या ठिणग्या उसाच्या फडात पडल्याने दत्तात्रय पिसाळ यांचा सव्वा एकर. बबन गणपत बामणे अर्जुन भाऊ बामणे ज्ञानेश्वर बामणे या शेतकर्यांचे साडेचार एकर २०० टन ऊस तोडणीच्या उंबरठ्यावर ऊभा असतानाच जळुन खाक झाल्याने प्रत्येक शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने विध्दुत मंडळाच्या या गलथान कारभाराचा फटका शेतकर्यांना बसल्याने शेतकर्यांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे. वास्तविक पाहता कवठे येथील शाखा अभियंता आणी वायरमन या पथकाने एकत्रीत येऊन लोंबकळत असणार्या विध्दुत तारांची पाहणी करुन त्या ओढुन घेणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी दोन खांबान मध्ये भरपूर अंतर आहे अशा ठिकाणी एक पोल उभा करणे अशा महत्व पुर्ण बाबीन कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत असल्याने त्याचा आर्थिक फटका हा विध्दुत मंडळालाच बसत आहे याचे भान शाखा अभियंता यांनी ठेवणे आवश्यक आहे .