बारामती पश्चिम ! जगातील २५ टक्के क्षयरोगी भारतात : डॉ फोगाट : सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात क्षयरोग दिन साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे "जागतीक क्षयरोग दिन" निमीत्त सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर व ज्युबिलियंट इनग्रेव्हिया यांच्या संयुक्त विद्यमाने "जनजागृती कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. 
         याप्रसंगी शैक्षणिक संकुलामधील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचान्यांना डॉ. सुर्जेन्दर फोगाट यांनी क्षयरोग निवारणाबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. फोगाट यांनी क्षयरोग मुक्तीकडे देशाची वाटचाल चालू आहे परंतु जगातील २५ टक्के क्षयरोगी भारतात असल्यामुळे आपण जबाबदार नागरीक म्हणून सामाजिक प्रबोधनाचे नेतृत्व करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनचे  अजय ढगे व हंसप्रभा पोतदार तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सचिव  भारत खोमणे, इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रा. एस. के. हजारे, सायन्स कॉलेजेचे प्राचार्य प्रा. धनंजय बनसोडे, डीन प्लेसमेंट डॉ. प्रिया जगताप हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स कॉलेज मायक्रो बायोलॉजी विभागाच्या प्रा. माधुरी भांडवलकर यांनी केले..
To Top