बारामती पश्चिम ! काकडे महाविद्यालयात क्षयरोग दिनाबाबत जागरूक सत्राचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन (वर्ल्ड टीबी डे) म्हणून साजरा केला जातो. ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सोमेश्‍वर येथील एम एस काकडे महाविद्यालयात जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
          या सत्रात डॉ.फोगट यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनचे अजय ढगे व हंसप्रभा पोतदार आणि ज्युबिलंट इंग्रेव्हिया लि.चे जनसंपर्क व्यवस्थापक इसाक मुजावर व एस एम काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदांडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला ७० हून अधिक शिक्षक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
         याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांकरिता ओरिएंटेशन कार्यक्रम घेण्यात आला. क्षयरोगाचे निर्मूलन व्हावे यादृष्टीने प्रयत्नांना गती देण्यासाठी जागरूकता मोहिमेमध्ये विविध प्रकल्पांसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.या स्वयंसेवकांद्वारे माहिती देऊन क्षयरोगाबाबत जागृती करण्यात आली.
To Top