पुरंदर ! वाल्हेच्या 'सुपुत्रा'चा राज्यात डंका : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण परीक्षेत राज्यात पहिला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक सुकलवाडी येथील सुमित शिवाजी पवार याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून या ४६ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते.  यामधून चिरंजीव सुमित शिवाजी पवार महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला सदर विद्यार्थी हा सुकलवाडी तालुका पुरंदर  या गावचा असून परिस्थितीमुळे करंजेपुल ता बारामती येथे त्याचे  मामा हनुमंत ज्ञानदेव गायकवाड यांच्याकडे लहानपणापासून कुटुंबासह शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी करंजेपुल या ठिकाणी वास्तव्यास आहे.  तरी मामा हनुमंत गायकवाड यांनी स्वतःची परिस्थिती नसतानाही आपला भाचा सुमित पवार याचा शिक्षणाचा पूर्णपणे खर्च केला  डिप्लोमा व पदवीधर शिक्षण पुणे या ठिकाणी पूर्ण करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करंजेपुल येथील ग्रामीण भागातील कृष्णाली अभ्यासिका या ठिकाणी अभ्यास करून कोणतेही क्लासेस न करता व आर्थिक परिस्थिती नसतानाही हालाखीच्या च्या परिस्थितीमध्ये अभ्यास पूर्ण केला व मोलमजुरी करणाऱ्या आईच्या स्वप्नांना बळकटी देण्याचे काम केले.  आईच्या व मामाच्या केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे चीज केल्यामुळे सोमेश्वर परिसरामध्ये सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे व कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही परिस्थितीवर मात करून एक चांगला अधिकारी होता येतं याचे उत्तम उदाहरण सुमितने दिले आहे.
To Top