सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर कारखान्यावर सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने वाहनतळावर निघालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचे खराब रस्त्यामुळे लाकूड मोडून ट्रॉलीमधील अर्धा ऊस रस्त्यावर पडला.
नशीब हा अपघात आज रात्री साडेआठ ते नऊ च्या दरम्यान घडला. त्यामुळे वर्दळ नव्हती. जर हा अपघात दिवसा झाला असता तर या अपघातात दोन ते तीन जण जखमी झाले असते. सोमेश्वर कारखाना ते सोमेश्वर हायस्कूल रस्त्यावर सकाळी पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच हा रस्ता गजबजलेला असतो. स्थानिक ग्रामस्थ, ऊसतोडणी कामगार तसेच विद्यालयात जाणारी शाळकरी मुलांची दिवसभर या रस्त्यावर उसाचे भरलेल्या वाहनांच्या बाजूने जा ये सुरू असते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून यामध्ये उसाचे भरलेल्या वाहनांना झोके खाताच वाहनतळावर पोहचावे लागते. याच झोक्यात प्राथमिक शाळे समोर हा अपघात झाला आहे. याबाबत कारखान्याने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.