पुरंदर ! ऐतिहासिक शस्त्र व युद्धकला अभ्यासक रवींद्र जगदाळे यांना मावळ शस्त्र रत्न पुरस्कार जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी 
तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेचे संस्थापक आणि ऐतिहासिक शस्त्र व युद्धकलेचे अभ्यासक रवींद्र जगदाळे यांना सागरभाऊ लांडगे युथ प्रतिष्ठानच्या वतीने मावळ शस्त्र रत्न 2022 हा पुरस्कार जाहीर झाला आहे 
          दि 1 एप्रिल रोजी देहूरोड येथर हा पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे . इतिहास संशोधक रवींद्र जगदाळे हे गेली 28 वर्षे राज्यातील किल्यांना भेटी देऊन ऐतिहासिक शस्त्रे व युद्धकला याचा अभ्यास करीत आहेत . तसेच युद्धकलेचे प्रशिक्षण,व शस्त्र प्रदर्शनाच्या द्वारे ऐतिहासिक शस्त्रे व युद्धकलेचे ते जतन करीत आहेत . राज्याच्या अनेक गावांत त्यांनी शस्त्रे प्रदर्शन व प्रात्यक्षिके सादर केली आहेत . या उल्लेखनीय कार्याबद्दल मावळ शस्त्र रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे . 

To Top