भोर ! विद्यार्थ्यांनी डोळसपणे जीवन व्यथित करून शिक्षण घ्यावे : प्रा. अरुण सुळगेकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
 विद्यार्थ्यांची शिस्त ही शाळेचा प्राण असल्याने विध्यार्थ्यांनी मोहापासून आणि चंगळवादापासून दूर राहून डोळसपणे आपले विध्यार्थी जीवन व्यथित करीत शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन सचिव अरुण सुळगेकर यांनी केले.                    पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे ता.भोर येथे १० वी विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सुळगेकर बोलत होते.याप्रसंगी शाळेत वर्षभरात झालेल्या नवनवीन स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तर १० वीच्या विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्राचार्य एस के.शिंदे,गोपाळ उभे,इस्माईल सय्यद शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शत्रूग्न सावले,पालक संघ उपाध्यक्ष संतोष म्हस्के,मुख्यध्यपिका सुजाता भालेराव,सदानंद जाधव,रजनी पोतदार,मदनमोहन मिरजे,सुनीता जाधव, सारिका गुरव,विनायक कांबळे,चंद्रकांत कुंभार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

      सुळगेकर पुढे म्हणाले नेरे शाळा गेले ७० वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच विध्यार्थ्याच्या कला गुणांमुळे स्वामी विवेकानंद संस्थेत शिस्तप्रियतेच्या बाबतीत नंबर एकची ठरलेली आहे. 

To Top