सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
गावठाण ड्रोन द्वारे मोजणी सर्वेक्षण ..........स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण भारत देशात केंद्र शासन यांचे पंचायत राज विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील गावठाण जमाबंदी योजना स्वामित्व योजना चा शुभारंभ वाई तालुक्यातील केंजळ या गावात सर्वप्रथम राबवण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ वाई भुमिअभिलेख च्या उपअधीक्षक सौ आशाताई जाधव तसेच वाई पंचायत समितीचे उपसभापती विद्यमान सदस्य अनिल आबा जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला .यावेळी बोलताना उपअधीक्षक सौ आशा जाधव म्हणाल्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन जमाबंदी प्रकल्प योजनेअंतर्गत वाई तालुक्यात केंजळ या गावी प्रथम ड्रोन द्वारे मोजणी करण्यात आली या मोजणी मुळे नगर भूमापन न झालेल्या गावात गावठाणात चे सर हद्दीतील प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्चित होऊन मिळकतीचे नेमके श्रेत्र माहित होईल गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड तयार होईल ग्रामस्थांचे नागरी हक्कांचे संरक्षण होईल गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा नाले यांच्या सीमा निश्चित होईल अतिक्रमण रोखता येईल मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. यावेळी वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्यमान सदस्य अनिल आबा जगताप यांनी भुमिअभिलेख च्या जाधव मॅडम आणि सर्वे ऑफ इंडिया विभागाचे सूर्यकांत लडकत साहेब यांचा सत्कार केला . तसेच वाई पंचायत समिती चे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार ,केंजळ गावचे सरपंच मिलन गायकवाड उपसरपंच अमोल कदम भूमिअभिलेख वाई येथील श्री श्रीकांत पवार, कमलाकर भोसले, प्रतिक खरात ,कुरेशी साहेब ,ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक निलेश जगताप केंजळ गावचे माजी सरपंच संपत बापू जगताप युवा कार्यकर्ते जयंत येवले ,सुभाष जगताप, शामराव जगताप ,तानाजी जाधव शैलेश कदम , रविंद्र जमदाडे ,संकपाळ ग्रामसेवक साहेब , तलाठी मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवसात केंजळ शेंदुरणे गुळुंब वेळे कोचळेवाडी वाई सिद्धनाथवाडी आणी सोनगीरवाडी या गावांची मोजणी पुर्ण झाली असल्याची माहिती वाई भुमी अभिलेकच्या प्रमुख असलेल्या सौ.आशाताई जाधव यांनी प्रतिनिधी शी बोलताना दिली .