भोर ! पीक कर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये रांगा : तालुक्यात गेल्या आठ दिवसात ९० कोटींचा भरणा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
 भोर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये मार्च इन्डिंगमुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे नियम पाळून भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. तालुक्यातून जळपास ९० कोटींच्या आसपास कर्ज भरणा झाल्याचे तालुका विभागीय अधिकारी सुदाम पवार यांनी सांगितले.
            भोर तालुक्यात दुर्गम,अतिदुर्गम भागात जिल्हा बँकेच्या ११ सुसज्ज शाखा असून सर्व शाखांमध्ये आठ दिवसंपडून कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.भरणा स्वीकारण्यासाठी रात्री ७ वाजेपर्यंत शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.पीक कर्ज धारकांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य सहकार्य केले.तसेच शिस्तबद्ध पणे कर्ज भरणा केला.तर सर्व शाखांमध्ये शेतकऱ्यांसाठी उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे वसुली अधिकारी विनोद काकडे यांनी सांगितले.

To Top