सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
१२ च्या १२ जागा जिंकल्याने जल्लोष बालवडी ( ता. भोर ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व मिळवले असून श्री भैरवनाथ सहकार विकास पँनलने १२/० असा सर्व जागावर विजय मिळवला.
सोमवार ( दि. २८) रोजी बालवडी विकास सेवा सोसायटीची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे , सचिव सुरेश वाघुलकर यांनी निवडणूकीचे पाहिले. यामध्ये काँग्रेस पुरुस्कृत
श्री भैरवनाथ विकास सहकार पँनलने १२/० या जागावर विजय मिळवून राष्ट्रवादी पुरुस्कृत श्री भैरवनाथ सहकार पँनलचा सर्व जागावर पराभव केला. विजयी उमेदवार संतोष भगवान भोसले, नारायण विठ्ठल किंद्रे, बाळासाहेब शंकर फणसे, सोनबा एकनाथ किंद्रे, विकास नथू किंद्रे, विठ्ठल खंडू किंद्रे, भिकू खंडू शिंदे, अतुल वसंत किंद्रे, मारुती विष्णू किंद्रे, सौ.शशिकला सतीश किंद्रे, सौ वंदना अर्जुन किंद्रे, विजय सखाराम गायकवाड यांची संचालक पदासाठी निवड झाली. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवाराचे सत्कार करण्यात आले. यावेळी नानासाहेब किंद्रे, शंकरराव किंद्रे, भारती सतिश किंद्रे, सौ.मंजुश्री अतुल किंद्रे, विठ्ठल खाशाबा किंद्रे, दशरथ किंद्रे, आबासाहेब भोसले, शामराव किंद्रे ग्रामस्थ उपस्थित होते.